गंगापूर, (प्रतिनिधी) : गंगापूर नगरपरिषदेकडून शहरातील सर्व थकीत मालमत्ता धारकांना महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. मालमत्ता कर तसेच पाणीपट्टी कर थकीत असलेल्या नागरिकांनी तात्काळ नगरपरिषद कार्यालयात करांचा भरणा करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
ज्या मालमत्ता धारकांनी गंगापूर नगरपरिषदेचा इशारा थकीत तसेच चालू आर्थिक वर्षाचे कर अद्याप भरलेले नाहीत, अशा धारकांविरुद्ध नियमानुसार जप्तीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशाराही नगरपरिषद नच्छ प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे कोणतीही अनावश्यक कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी वेळेत कर भरणा करून नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशीही नगरपरिषद कार्यालय सुरू ठेवण्यात आले असून, कर भरण्यासाठी ही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी केले आहे.










