कन्नड, (प्रतिनिधी) : तालुका तालुक्यातील मका उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले असून, गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या मका खरेदीचे अद्यापही शेतकऱ्यांना पेमेंट मिळालेले नाही. याबाबत उबाठाचे तालुका संघटक डॉ. आण्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
तहसिलदार यांना निवेदन देताना डॉ. अण्णा शिंदे. कन्नड तालुक्यातील मकाच्या प्रश्नाबाबत तहसीलदार सारिका भगत खरेदी केलेल्या मक्याचे पैसे तात्काळ वितरित करावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, नवीन मका खरेदीसाठीची ऑनलाइन नोंदणी सध्या बंद असून ती तात्काळ सुरू करावी, अशीही मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
तसेच करंजखेड़ा मका खरेदी केंद्र वगळता इतर ठेवण्यात आली केंद्रे उदिष्ट कमी असल्याने बंग शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचर्णीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी मागणी आहेत,
यामुळे केली आहे की तालुक्यातील सर्व मका खरेदी केंद्रांना प्रत्येकी ५० हजार किं टलचे उद्दिष्ट देण्यात यावे. तसेच, तातडीने केंद्रनिहाय किमान ५ हजार क्विंटलचे उद्दिष्ट देऊन खरेदी सुरू ठेवावी. या सर्व मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास, २ मार्च पासून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. निवेदनावर डॉ. आण्णा शिंदे, दिपक बोडखे, गोकुळ गोरे आदींच्या यांच्या सह्या आहेत.










