अज्ञात मोटारसायकलच्या धडकेत पादचारी ठार

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर मार्गावरील भेंडाळा येथे रस्ता - ओलांडत असलेल्या पादचाऱ्याला भरधाव अज्ञात  मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने नवीन - कायगाव (ता. गंगापूर) येथील आचऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची - घटना रविवारी (दि. १५) रोजी सकाळी सात वाजता घडली.

भेंडाळा येथे एका हॉटेलमध्ये आचारी कृष्णा रामभाऊ राऊत (४८, रा. नवीन कायगाव, ता. गंगापूर) हे सकाळी रस्ता ओलांडत असताना छत्रपती संभाजीनगरवरून अहिल्यानगरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात मोटारसायकलस्वाराने जोरदार धडक दिली. या अपघातात राऊत गंभीर जखमी झाले. 

अपघातानंतर सागर शेजूळ, मंगेश खाजेकर यांनी त्यांना तातडीने गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून कृष्णा राऊत यांना मृत घोषित केले. कृष्णा राऊत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय, पुतणे पुतण्या असा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत