मातंग समाजाच्या सामाजिक सभागृह व स्मशानभूमीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार : आ. सत्तार

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील मातंग समाजाच्या सामाजिक सभागृह व स्मशानभूमीच्या प्रलंबित प्रश्नांसह इतर अडीअडचणी प्राधान्याने मार्गी लावू अशी ठाम ग्वाही आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. समाजबांधवांनी मांडलेल्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेऊन ते सोडविण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वांगी बुद्रुक (ता. सिल्लोड) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाज परिवर्तन संमेलन, समाज प्रबोधन, अभिवादन व सत्कार समारंभ आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत व अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते. कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. मनोज राठोड, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन पाटील गाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश ताठे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, पंचायत समितीचे माजी उपसभापती अजिजशेठ बागवान, अंबादास शिंदे, माजी नगरसेवक प्रशांत क्षीरसागर, सरपंच बाळू पाटील साळवे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे कार्य आणि विचार प्रेरणादायी आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी शाहिरीच्या माध्यमातून जनजागृती करत महत्त्वपूर्ण योगदान दिले. अण्णाभाऊ साठे यांना खऱ्या अर्थाने समजून घ्यायचे असेल तर त्यांच्या साहित्याचे वाचन करा, त्यांचे विचार आत्मसात करा आणि समाजाच्या प्रगतीसाठी त्यातून प्रेरणा घ्या, असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले. 

यावेळी आमदार सत्तार यांनी वांगी बुद्रुक येथील समाजबांधवांशी संवाद साधून त्यांच्या विविध अडीअडचणी जाणून घेतल्या. सामाजिक सभागृह, स्मशानभूमी तसेच समाजाच्या इतर मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांची माहिती घेत, हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते भीम लहू नगर नामफलक, लहुजी क्रांती सेना सामाजिक संघटना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. लहुजी क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे, उपाध्यक्ष सखाराम अहिरे, मराठवाडा अध्यक्ष नानासाहेब गायकवाड, माजी सैनिक बाजीराव कांबळे, बहुजन जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अण्णा मोठे, जिल्हाध्यक्ष सुखदेव खाजेकर, जिल्हा उपाध्यक्ष शिराज शेख, गंगापूर तालुकाध्यक्ष किशोर शिंदे, पैठण तालुकाध्यक्ष किशोर कांबळे, सोमीनाथ भालेराव, किशोर दणके, विलास कोतकर, संगीता भालेराव, अशोक शेजुळ, नीला कांबळे, संगीता शेजुळ, कैलास मोरे, विष्णू सौदागर, काशिनाथ शिंदे, साहेबराव सोनवणे, विष्णू सोनवणे, संजय मोरे, साहेबराव अहिरे, सुखदेव कांबळे, फकीरचंद तांबे, बाबुराव अहिरे, भाऊसाहेब कांबळे, अमोल खेत्रे, रवी कांबळे, राहुल कांबळे, दीपक लोखंडे, रवींद्र महाले, सुदाम कांबळे, सोमीनाथ दणके, शिवाजी चंदनशिवे, अंबादास काकफळे, दुर्गादास जाधव, संदीप चंदनशिवे, कैलास नाडे, करण कांबळे, आकाश शिंदे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते