सांजवार्ता ऑनलाईन
औरंगाबाद – सणांच्या काळात पेट्रोलियम
कंपन्यांनी सुरु केलेली दर कपात सलग १२व्या दिवशी सुरु आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात
कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्यामुळे भारतीय ग्राहकांना काहीसा दिलासा मिळत आहे.
त्याआधी पेट्रोल शतक गाठते की काय अशी भीती ग्राहकांना वाटत होती. १२ दिवसांमध्ये
पेट्रोलच्या दरात ३ रुपये ८ पैसे तर डिझेल १.८४ पैसे स्वस्त झाले आहे.
मागील काही दिवसांपासून पेट्रोलच्या किंमतीने
आजपर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले होते. पेट्रोल शंभरी गाठणार अशी स्थिती
निर्माण झाली होती. तेव्हा केंद्र शासनाच्या आदेशानंतर राज्य सरकारांनी २.५० रुपये
इंधन दरकपात केली होती. सोमवारी झालेल्या कपातीनंतर मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ८५.२४
रुपये तर डिझेल ७७.४० रुपये लिटर दराने मिळत आहे.
आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात
पुढील काही दिवस सतत घट होत असल्याने
पेट्रोल – डिझेलचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
















