नवी दिल्ली : देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर अद्यापही उच्च पातळीवर काम असून, सर्वसामान्यांना इंधन दरवाढीतून तातडीने दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. पश्चिम आशियातील संघर्ष आणि पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे तेल कंपन्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्यापूर्वी तेल कंपन्यांच्या नुकसानीचा हिशेब होणे आवश्यक असल्याचे मत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी स्पष्ट केले.
वृत्तसंस्था च्या वृत्तानुसार, सोमवारी चेन्नईतील मीनांबक्कम विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. तेल कंपन्यांना सुमारे ४२ हजार कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सध्या इंधनाच्या दरात तातडीने कपात करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तेल कंपन्यांचे नुकसान भरून निघाल्यानंतरच दरकपात?
पेट्रोल-डिझेलच्या किमती कधी कमी होणार, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. यावर बोलताना सुरेश गोपी म्हणाले की, सरकारलाही इंधनाचे दर लवकर कमी व्हावेत असे वाटते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत तातडीने दरकपात करणे शक्य नाही. ङ्गङ्घआमचीही इच्छा आहे की दुसर्याच दिवशी इंधनाचे दर कमी व्हावेत. मात्र, तांत्रिकदृष्ट्या सध्या ते शक्य नाही,फफ असे त्यांनी सांगितले. पश्चिम आशियातील संघर्षामुळे पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, तेल कंपन्यांना झालेल्या नुकसानीचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यांना व्हॅट कमी करण्याचा सल्ला
इंधन दरांमुळे सर्वसामान्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी राज्य सरकारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही केंद्रीय राज्यमंत्र्यांनी केले. राज्य सरकारे त्यांच्या अधिकारात पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर () कमी करू शकतात. त्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो, असे त्यांनी सूचित केले. दरम्यान, पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होत असल्याची कबुलीही सुरेश गोपी यांनी दिली. पुरवठा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सरकार आवश्यक ती पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठ्यात सध्या मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावले आम्ही उचलत आहोत, असे ते म्हणाले.
देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर काय?
राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर १०२.१२ रुपये, तर डिझेलचा दर ९५.२० रुपये प्रति लिटर आहे. कोलकात्यात पेट्रोल ११३.५१ रुपये आणि डिझेल ९९.८२ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १११.२१ रुपये, तर डिझेलचा दर ९७.८३ रुपये प्रति लिटर आहे. तर, हैदराबादमध्ये पेट्रोलसाठी ११६.५१ रुपये आणि डिझेलसाठी १०४.२३ रुपये प्रति लिटर मोजावे लागत आहेत.
कच्च्या तेलाचा दर ९६ डॉलर प्रति बॅरलवर
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होत असतो. सध्या कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ९६ डॉलरच्या आसपास आहे. मागील आठवड्यात, ८ नोव्हेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट आणि क्रूडच्या किमतींमध्ये एकाच दिवसात सुमारे ३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती. मात्र, कच्च्या तेलाच्या किमती वाढूनही देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर बदललेले नाहीत. सध्या हे दर जुन्याच पातळीवर स्थिर आहेत.