सिल्लोड, (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगरहून जळगावकडे जाणाऱ्या पिकअप वाहनाचा (क्र. एमएच ०५ बीएच ३३९५) अजिंठा घाटातील धोकादायक वळणावर अपघात झाला.
घाट उतरताना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत वाहक आकाश जाधव (वय ३७, रा. जळगाव) हे गंभीर जखमी झाले. फर्दापूरचे पोलिस कॉन्स्टेबल फिरोज तडवी यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमीला त्वरित रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले आणि विस्कळीत वाहतूक सुरळीत केली.











