पैठण, (प्रतिनिधी): भवानीनगर येथील डॉ. श्रद्धा हॉस्पिटल ते श्रीराम रेडीमेड समोर सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामात कोणतेही बेड काँक्रेट न करता पाईप टाकण्याचे काम सुरू आहे या कडे मुख्याधिकारी या दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.
लॉढे हॉस्पिटल ते पन्नालाल नगर येथील ड्रेनेज लाईनचे काम नित्कृष्ट दर्जाचे झाले असल्याने त्या कामाची अनेकांनी तक्रार केली असल्याने सदरील काम बंद करण्यात आले होते. ते प्रकरण ताजे असतानाच पुन्हा भवानीनगर येथील श्रद्धा हॉस्पिटल ते श्रीराम रेडिमेट समोर काव्सनकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा ड्रेस चे काम सुरू आहे. या ठिकाणीही कोणतेही बेड काँक्रेट न करता नाल्यामध्ये पाईप टाकले
जात असून निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे.या कामाची मुख्याधिकारी यांनी पाहणी करून निकृष्ट दर्जाचे होत असलेले सदरील काम बंद करून या कामाचे बिल देण्यात येऊ नये.














