गणेशोत्सवासाठी महापालिकेची 'एक खिडकी' योजना

Foto
पूर्वपरवानगीशिवाय मंडप उभारता येणार नाही
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळे आणि नागरिकांची सोय व्हावी यासाठी महापालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तात्पुरते मंडप, स्टेज तसेच श्रीगणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल उभारणीसाठी महापालिकेच्या वतीने 'एक खिडकी' सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत मंडप अथवा स्टॉलसाठी परवानगी घेऊ इच्छिणाऱ्यांना २ ते २५ सप्टेंबरदरम्यान कार्यालयीन वेळेत अर्ज करता येणार आहे. महापालिकेची रीतसर पूर्वपरवानगी मिळाल्यानंतरच
प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मंडप किंवा स्टॉल उभारणीस मुभा दिली जाणार असल्याचे
महापालिकेने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळे आणि नागरिकांना तात्पुरते मंडप, स्टेज तसेच श्रीगणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल उभारण्यासाठी एक खिडकी सुविधा सुरू केली आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वे २०२६ नुसार परिपूर्ण अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. केवळ अर्ज दाखल केल्याने परवानगी मिळाल्याचे गृहीत धरता येणार नाही. महापालिकेची अधिकृत परवानगी प्राप्त झाल्यानंतरच
मंडप, स्टेज अथवा मूर्ती विक्रीचा स्टॉल उभारता येणार आहे. तसेच मंडप किंवा स्टेज उभारताना वाहतूक व्यवस्था, पादचारी मार्गासह नागरिकांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होणार नाही, याची जबाबदारी संबंधित गणेश मंडळांची राहणार आहे. त्याचप्रमाणे मूर्ती विक्रीसाठी स्टॉल उभारणाऱ्या विक्रेत्यांनीही वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना महापालिकेने केल्या आहेत. परवानगी न घेता मंडप, स्टेज अथवा श्रीगणेश मूर्ती विक्रीचा स्टॉल उभारल्यास तो तत्काळ हटविण्यात येऊन संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions