लोखंडी जाळ्या उभारणी सुरू, परिसरातील अतिक्रमण अडथळे हटवण्यासह आदी कामे सुरू
खुलताबाद, (प्रतिनिधी): श्रावण मासारंभ सुरु होत असुण त्याची तयारी व्यवस्थापन प्रशासनाने तातडीने सुरू केली आहे. श्रवण पवित्र महिना (मासारंभ) सुरू होत असल्याने वेरुळ येथील बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर परिसरात भाविकांची सुरक्षा सह दर्शन व्यवस्था ठेवण्यासाठी देवस्थान संस्थान व पोलीस प्रशासन जोरात कामा लागला आहे.
काल (दि. ११ बैठकीचे आयोजन ही करण्यात आले आहे. पवित्र श्रावण महिन्यात लाखो शिवभक्त भाविक भक्त वेरुळ
येथे दर्शनासाठी येतात. भाविकांना त्रास होवू नये म्हणून लोखंडी जाळ्या (बॅरिकेड्स) लावण्याचे काम जोरात सुरू आहे.
गर्दी आणि सुरक्षा व वाहतूक व्यवस्था याचा ताण प्रशासनावर असतो त्यात मंदिर परिसरात फुल नारळ व साहित्यांचा दुकाना अडथळा ठरत असल्याने पोलिस पथकाकडून दुर करण्यात आले. सुरक्षा लोखंडी जाळ्या लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. श्रावण मासारंभ निमित्त मोठ्या हालचाली वेरुळ बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर परिसरात सुरू आहे.














