छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जन्मोत्सव हरित महोत्सव तसेच हरित महाराष्ट्र सप्ताह या उपक्रमांतर्गत मराठवाड्यातील वृक्षलागवड अभियानाचा आज उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
माजी आमदार तथा देवा सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संजय केनेकर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण मराठवाड्यात ५ लाख वृक्षलागवड करण्याचा संकल्प करण्यात आला. या विशेष अभियानाचा शुभारंभराज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे पाटील, ऑरिकचे मुख्य कार्यकारी - अधिकारी अरुण दुबे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष डॉ. उज्वला दहिफळे, निवृत्त शिक्षणाधिकारी तथा पदवीधर
देवेंद्रजी फडा
या जन्मदिनानिमित
রधाल
मतदारसंघाचे सहनोंदणी प्रमुख म. के. देशमुख, भाजपा कोचिंग क्लासेस प्रकोष्ठाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. पांडुरंग मांडकीकर, गॅलेक्सी लॅबोरेटरीचे संचालक श्रीकांत देशमुख, नगरसेवक रामेश्वर भादवे, नगरसेवक छाया खाजेकर, भाजपा शहर जिल्हा उपाध्यक्ष दीपक ढाकणे आदी उपस्थित होते.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions









