(सांजवार्ता छत्रपती संभाजीनगर, ब्युरो) : लग्नसोहळ्यासाठी पाहुणे जमले, स्वयंपाकही झाला. वधू-वर बोहल्यावर चढणार तेवढ्यात दामिनी पथकाला वधू अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली. पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत विवाह थांबवला. रविवारी (दि.२६) सातारा परिसरातील दीपनगरमध्ये ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यात एक कुटुंब रोजगारासाठी शहरात आले. येथील एका बांधकाम साइटवर पती हमाली, तर पत्नी मातीकाम करते. त्यांना १३ वर्षांची मुलगी असून, तीदेखील आईला कामात मदत करते. या मुलीसाठी एका २५ वर्षीय तरुणाचे स्थळ आले. तो पुण्यात काम करतो, असे सांगण्यात आले. चांगले स्थळ आहे, म्हणून आईने विवाह ठरवला. मोजक्याच ५० ते ६० लोकांमध्ये हा विवाह होणार होता. मात्र, याबाबत माहिती मिळताच बाल संरक्षण समितीचे कर्मचारी नीतेश दुर्वे, दामिनी प्रमुख कांचन मिरधे यांच्या
जेवणानंतर वऱ्हाडी परतले
पोलिस घटनास्थळी आल्याने वहऱ्हाडीही घाबरले होते. पोलिसांनी नवरदेवाचा भाऊ आणि आई यांना कायद्याची माहिती दिली. विवाह थांबवल्यानंतर मुलगा आणि मुलीकडच्या पाहुण्यांना आता जेवण करून घ्या, असे आवाहन करण्यात आले. त्यानुसार वऱ्हाडी जेवण करून परतले.
मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लता जाधव, अंमलदार मोनिका दिवे, सुनीता नागलोद, अनिता खैरे, सरिता कुंडारे, साक्षी चंद्रे, कविता गवळी घटनास्थळी पोचले. बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अंतर्गत संबंधितांना समज देऊन विवाह थांबविण्यात आला. पालकांचे समुपदेशन करण्यात आले. संबंधितांना मंगळवारी (दि.२८) बालकल्याण समितीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
https://epaper.sanjwarta. Powered By: Vrudhee Solutions












