वाळूज (प्रतिनिधी) महानगर, : गोवंश जनावरांना कत्तलीसाठी आणून गोठ्यात बांधलेल्या लहान मोठया नऊ जनावरांची सूटका करण्यात वाळूज पोलिसांना यश आले. ही कारवाई नारायणपूर बुद्रुक (ता. गंगापूर) येथे रविवारी (दि.२४) सकाळी करण्यात आली. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बशीर अजीज शेख व मोसिन बशीर शेख (२३) रा. पंढरपूर (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
वाळूजचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे,
रमेश राठोड, जलील पठाण, पोलीस अंमलदार विजय णपूर पिंपळे, स्वप्निल खाकरे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, नारायणपूर येथे स्मशानभूमीजवळ एका गोठ्यात अवैध गोवंशांची हत्या करण्यात येत आहे.
दरम्यान, छापा मारला असता तेथे नऊ जनावरे, सतुर, सुरे व पाण्याचे ड्रम असे साहित्य मिळून आले. याप्रकरणी मोसिन यास विचारपूस केली असत कत्तलीसाठी साठी जनावरे आण कबूल केले. वाळूज पोलिसां त्यास ताब्यात घेतले असून एका फरार आहे. पुढील तपास ऐसे उपनिरीक्षक रमेश राठोड का आहे.














