अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर पोलिसांची कारवाई; तीस लाखाचा मुद्देमाल जप्त

Foto
पैठण, (प्रतिनिधी) चनकवाडी बंधारा येथे विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करताना गुरुवारी पोलिसांनी एका हायवा वाहनावर कारवाई केली आहे. दोघाजणाविरुद्ध गुन्हा दाखल  केला आहे.

यामध्ये पोलिसांना टाटा कंपनीचा १५१८ हायवा ( पासिंग क्रमांक ४६--५२९७) विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करताना मिळून आला. पोलिसांनी लक्ष्मण पुरी पोलीस हेड कॉन्स्टेबल यांच्या फिर्यादीवरून आरोपी मोहम्मद मोहिनोदिन शेख व कयूम खुदुस खतीब राहणार सादात मोहल्ला पैठण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान कयूम खुदूस खतीब याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत.