तपासासाठी आलेल्या पोलिस पथकावर मिसारवाडीत हल्ला

Foto
साजवार्ता
Page No.: 3 Date: 14/11/2026
कर्मचाऱ्याच्या डोक्यात दगड घालून कारची चावी हिसकावली
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी शहरात आलेल्या फुलंब्री पोलिसांच्या तपास पथकावर चौघा जणांनी जीवघेणा हल्ला चढवल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मिसारवाडीतील अण्णा भाऊ साठे चौकाजवळ घडली. पोलिसांनी स्वतःचे ओळखपत्र दाखवूनही हल्लेखोरांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी केले, तसेच त्यांच्या वाहनाची चावीही हिसकावून घेतली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात
रवी मिसाळ, यश मिसाळ आणि त्यांच्या अन्य दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैलास प्रेमसिंग राठोड (४२) हे फुलंब्री पोलिस ठाण्यात हवालदार आहेत. पोखरी शिवारातील घरफोडी प्रकरणाचा तपास करण्यासाठी सहकाऱ्यांसह नारेगाव आणि मिसारवाडी परिसरात आले होते. या पथकात राठोडसह नागलोद आणि सुनील सोनवणे यांचा सहभाग होता. हे पथक साध्या वेशात तपास करून खासगी कारने एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याकडे जात असताना अण्णा भाऊ साठे चौकाजवळ पाठीमागून आलेल्या दुचाकीने (एमएच-२०-जीएफ-०९७५) त्यांच्या कारला धडक दिली. यात दुचाकीवरील रवी मिसाळ आणि यश मिसाळ हे दोघे खाली पडले. पोलिसांनी त्यांना उचलून रस्त्याच्या बाजूला केले. मात्र, दोघांनी पोलिसांशी वाद
घालण्यास सुरुवात केली.
लाथाबुक्क्याने मारहाण पोलिसांनी ओळखपत्रही दाखवूनही मिसाळ बंधूंनी मारहाण केली. त्यातील एकाने फोन करून साथीदारांना बोलावून घेतले. काही वेळातच दोन तरुण तेथे आले. त्यांनीही जीवे मारून टाकू अशी धमकी देत एका कर्मचाऱ्याच्या डोक्यात दगड घातला. व इतरांनाही लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
नागरिकांनी केली सुटका : पोलिसांना मारहाण करत
असतानाच एका तरुणाने सोनवणे यांच्याकडील कारची चावी हिसकावली. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी थाव घेत पोलिसांची हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका केली. भर स्स्त्याच्या झालेल्या या मारहाणीमुळे नागरिकही आवाक झाले होते. गंभीर जखमी सोनवणे यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions