दुचाकी चोरणारे त्रिकूट पोलिसांच्या जाळ्यात

Foto
५ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त

दौलताबाद, (प्रतिनिधी): दौलताबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेला दुचाकी चोरीचा गुन्हा अवघ्या दोन तासांत उघडकीस आणत पोलिसांनी तीन अट्टल आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींकडून चोरीच्या चार पाण्याच्या मोटारींसह गुन्ह्यात वापरलेली मारुती सुझुकी अर्टिगा कार असा एकूण ५ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

११ सप्टेंबर रोजी दौलताबाद पोलिस ठाण्यात मोटार चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक एम. ए. खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाने तपासाला वेग दिला. तपासादरम्यान पोलिसांच्या गोपनीय बातमीदाराकडून काही संशयित तरुण चोरीचा मुद्देमाल असल्याची माहिती मिळाली. या विक्रीसाठी घेऊन जाणार माहितीच्या आधारे पोलिसांनी पेकळवाडी-गोकुळवाडी रोडवर तात्काळ सापळा रचला. यावेळी तीन संशयितांना - मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. 

त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली अटक केलेल्या आरोपींमध्ये दिल्याचे - पोलिसांनी सांगितले. रोहन धनराज बिधोत (१९, रा. टाकाळीवाडी, - ता. गंगापूर), किशोर अशोक माळी (१९) आणि समाधान लक्ष्मण सुरासे (१९, दोघे रा. माळीवाडगाव, ता. गंगापूर) यांचा समावेश आहे. - आरोपींकडून मारुती सुझुकी अर्टिगा कार (एमएच १४ ईएच ५४६२) - तसेच चार पाण्याच्या मोटारी असा एकूण ५,५८,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.