चोपन्न हजारांचा मुद्देमाल जप्त
पैठण, (प्रतिनिधी) : : एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी सकाळी संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यासमोर पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या ऑनलाईन चक्री जुगार अड्ड्यावर धाड टाकून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी एकुण ५४००० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरील कारवाई सपोनि भरत मोरे, उपनि बुरकुल, पोलिस, पंडित, कृष्णा उगले, करतरसिंग सिंगल, गोपाळघरे यांनी केले आहे.
दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत संत एकनाथ सहकारी साखर कारखाना समोर, बालानगर, ढाकेफळ परिसरात, वाहेगाव, राहुलनगर कातपूर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहे.
याकडे स्थानिक पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे. नवीन आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांनी या अवैध धंद्या विरुद्ध मोहीम हाती घेतली आहे.













