२ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त
वैजापूर, (प्रतिनिधी) : वैजापूर तालुक्यातील दुणकी शिवारात विनापरवाना देशी दारूची चोरटी विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत अनिल नानासाहेब निकम (वय ३५, रा. टुणकी, ता. वैजापूर) याच्याकडून २ हजार २८० रुपये किमतीच्या देशी दारूच्या १९ बाटल्या जप्त करण्यात आल्या.
दि. ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास टुणकी शिवारातील हॉटेल पृथ्वीसमोर ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी अनिल निकम हा देशी दारूच्या भिंगरी संत्रा बँडच्या १८० मिली क्षमतेच्या १९ सीलबंद बाटल्या विनापरवाना ताब्यात बाळगून त्यांची चोरटी विक्री करताना आढळून आला.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शिवानंद बनगे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार शिऊर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार राहुल थोरात करीत आहेत.















