गंगापूर, (प्रतिनिधी) तालुक्यातील भेंडाळा प्राथमिक
आरोग्य केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त
प्रतिसाद लाभला.
या मोहिमेदरम्यान जिल्हा परिषद सदस्या सौ. दीपा सचिन मुंदडा, ग्रामपंचायत सरपंच गाडेकर काकू तसेच दीप्ती सुमित मुंदडा यांनी उपस्थित राहून मोहिमेला शुभेच्छा दिल्या.
यावेळी वैद्यकीय अधिकारी मोरे, चव्हाण, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. मोहिमेअंतर्गत पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजले.
प्रत्येक पालकाने पाच वर्षांखालील बालकाला पोलिओचे दोन थेंब देऊन या मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.