दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, काँग्रेस -भाजप आमनेसामने मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर भाजपचा गेम प्लॅन साठी आटपिटा ! काही केल्या लोकसभेतील ३६० खासदारांचे गणित जुळेना...

Foto
नवी दिल्ली: केंद्र सरकारने लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींना दोन्ही सभागृहांचे कामकाज बोलावण्याची विनंती केली आहे. सरकारच्या या विनंतीवरून ३० नोव्हेंबर रोजी लोकसभेचे, तर २ डिसेंबर रोजी राज्यसभेचे कामकाज सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या कामकाजात परिसीमन विधेयक (मतदारसंघ पुनर्रचना) मंजूर करून घेण्यासाठी भाजपने जोर लावला असून समीकरणे जुळवली असल्याची चर्चा आहे.

सुमारे आठ महिन्यांपूर्वीही विधेयक सभागृहात मांडण्यात आली होती. मात्र, हे घटनादुरुस्ती विधेयक असल्याने त्यावेळी सरकारला आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमताअभावी मंजूर करता आले नाही. आता सरकार पुन्हा एकदा नव्याने आकड्यांची जुळवाजुळव करत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, सभागृहात दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यासाठी सध्या तीन मुख्य शक्यता दिसून येत आहेत.

लोकसभेतील जागांचे नेमके गणित:
एकूण जागा: ५४३
सध्याचे सदस्य: ५४०
दोन-तृतीयांश बहुमतासाठी आवश्यक संख्या: ३६०
एनडीएचे संख्याबळ: ३२०

समीकरण १: डीएमके, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि वायएसआरसीपीचा पाठिंबा
जर या तिन्ही पक्षांनी विधेयकाला पाठिंबा दिला, तर एनडीएचे एकूण संख्याबळ ३५४ पर्यंत पोहोचेल. यामध्ये एनडीएचे ३२०, डीएमकेचे २२, राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे ८ आणि वायएसआरसीपीच्या ४ खासदारांचा समावेश असेल. तरीही हा आकडा दोन-तृतीयांश बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ३६० या संख्येपेक्षा ६ मतांनी कमी पडतो. ( आकडेवारीनुसार ३२०+२२+८+४ = ३५४ होतात, जे ३६० पेक्षा ६ ने कमी आहेत).

समीकरण २: शरद पवार गट व   वायएसआरचा पाठिंबा अन् डीएमकेची अनुपस्थिती
या शक्यतेनुसार राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि वायएसआरसीपीने विधेयकाच्या बाजूने मतदान केले आणि डीएमकेने मतदानातून बाहेर राहणे पसंत केले, तर एनडीएच्या बाजूने ३३२ मते (३२० + ८ + ४) पडतील. अशा स्थितीत मतदान करणार्‍या एकूण सदस्यांची संख्या ५१८ राहील आणि दोन-तृतीयांश बहुमतासाठी ३४६ मतांची गरज असेल. या स्थितीतही सरकार दोन-तृतीयांश बहुमतापेक्षा १४ मतांनी मागे राहील.

समीकरण ३: डीएमके व शरद पवार गटाचा पाठिंबा आणि वायएसआरसीपीची अनुपस्थिती
जर डीएमके आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) या दोन्ही पक्षांनी विधेयकाला पाठिंबा दिला आणि वायएसआरसीपी मतदानापासून दूर राहिली, तर एनडीएला ३५० मते (३२० + २२ + ८) मिळतील. या वेळी एकूण ५३६ खासदार मतदानात सहभागी होतील, ज्यामुळे बहुमताचा आकडा ३५८ इतका असेल. या समीकरणानुसारही एनडीएला दोन-तृतीयांश बहुमतासाठी ८ खासदारांची कमतरता भासेल.

हा फॅक्टर ठरणार महत्त्वाचा...
वरील तिन्ही शक्यतांमध्ये थेट आकडेवारीनुसार एनडीए बहुमताच्या थोडे मागे दिसत असली, तरी ही परिस्थिती तेव्हाच उद्भवेल जेव्हा संपूर्ण विरोधक सभागृहात उपस्थित राहून मतदान करतील. विरोधकांची १०० टक्के उपस्थिती राहण्याची शक्यता कमी मानली जात आहे. मागील वेळीही या विधेयकावर मतदान झाले तेव्हा विरोधी पक्षांचे अनेक खासदार सभागृहात गैरहजर होते. याशिवाय, सभागृहातील अनेक लहान प्रादेशिक पक्ष, अपक्ष खासदारांवरही सरकारचे लक्ष लागले आहे. मतमोजणीत या खासदारांचे महत्त्व वाढले आहे.

काँग्रेस अलर्ट मोडवर, सर्व खासदारांना दिल्लीत दाखल होण्याच्या सूचना
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ३० नोव्हेंबरला भाजप सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं आहे. याच अधिवेशनात डिलिमिटेशन बिल देखील सादर होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसकडून आपल्या सर्व खासदारांना दिल्ली दाखल होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या आत दिल्लीमध्ये हजर व्हा, अशा सूचना पक्षाच्या वतीने खासदारांना देण्यात आल्या आहेत.