प्रणव पप्पू भोलेचा खून की आत्महत्या परिसरात चर्चेला उधाण

Foto
पैठण, (प्रतिनिधी) ईसारवाडी शिवारात बुधवारी (दि. ६) मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत प्रणव पप्पू भोले क्य २० रा. कोथमिरे गली (नाशिक) याचा मृतदेह आढळून आला, असल्याने या परिसरात खळबळ उडाली होती. 

या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील इंसारवाडी येथील पाहुण्यांकडे प्रणव पप्पु भोले (वय २० रा. कोथमौरे गल्ली, नाशिक) हा राहत होता. दि. ६ बुधवारी रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह ईसारवाडी शिवारातील एका प्लॉटिंगच्या मोकळ्या जागेत असलेल्या लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. 

या घटनेची माहिती सकाळी उघडकीस आल्यानंतर एमआयडीत्ती पैठण पोलिस ठाण्याचे जमादार राहुल मोहतमल यांच्यासह पोलीस कर्मचान्यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रणव भोले यास पैठण येथील शासकीय रुग्णालयात सकाळी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास तपासून मयत घोषित केले. प्राथमिक स्वरुपात ही जरी आत्महत्या असल्याचे दिसत असले तरी या युवकाचा खून करण्यात आला असल्याची चर्चा दबक्चा आवाजात सुरू आहे. 

या प्रकरणी एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि ईश्वर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार राहुल मोहतमल करत आहे. या प्रकरणी योग्य दिशेने तपास केल्यास खरा प्रवार उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.