कन्नड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील जवखेडा बु. येथे श्री भगवान प्रभू रामचंद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा होणार आहे. यासाठी गावात जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. २४ ते २६ मार्च या कालावधीत हा त्रिदिवसीय सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून, विविध संत कीर्तनकार -महंत, आणि भाविकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. मंगळवारी (दि. २४) मूर्तीची भव्य मिरवणूक व आसनादी कार्यक्रमाने सोहळ्याची सुरुवात होईल.
बुधवारी (दि. २५) वेदशास्त्र संपन्न प्रफुल्ल बापू बिलवे व विपुल बापू तिवळे यांच्या मंत्रघोषात मुख्य प्राणप्रतिष्ठा विधी पार पडणार आहे. बुधवारी -सकाळपासून होम हवन, प्राणप्रतिष्ठव व कळसारोहण विधी पार पडतील. सायंकाळी ५ वाजता भाविकांसाठी पूर्णपोळी युक्त महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. त्याच दिवशी रात्री ८. ३० ते १०.३० या वेळेत राधेश्याम महाराज यांचे कीर्तन होणार आहे. गुरुवारी (दि. २६) रामनवमी उत्सवानिमित्त भजन, पूजन व धार्मिक कार्यक्रमांनी सोहळ्याची सांगता होईल.
या भव्य सोहळ्याच्या आयोजनात गावातील विविध भजनी मंडळे व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. सर्वस्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गावात स्वच्छता, सजावट व प्रकाशयोजना करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत. या पवित्र सोहळ्याचा लाभघेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले














