इसारवाडी फाट्यावर खाजगी बसचा अपघात

Foto

औरंगाबाद: औरंगाबाद-पुणे महामार्गावरील इसारवाडी फाट्यावर वळण घेत असलेल्या टँकरला ट्रॅव्हल्स बस धडकून अपघात झाल्याची घटना सकाळी सहाच्या सुमारास घडली.

पोलिसानी दिलेल्या माहितीवरून, महामार्गावरील इसारवाडी फाट्यावर टँकर (एम एच २०, ए टी ६८८५) वळण घेत असताना नागपूरकडून पुण्याकडे जाणारी खाजगी बसने (एम एच ४०, ए टी ९३५) धडक दिली.त्यामुळे बस रस्त्याच्या खाली उतरली तेथे असलेल्या विजेच्या खांबाला घासत गेल्याने तिचा पत्रा फाटला, त्यानंतर बस एका झाडावर जाऊन आदळली. यात बस मधील एकजण गंभीर जखमी, तर २० जण किरकोळ जखमी झाले. बसचालक नरेंद्र नागोराव डवरे (रा. नागपूर) यांनी बसवर ताबा मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. महामार्गावर अपघात घडू नये यासाठी गतिरोधक टाकले आहेत.  मात्र, त्यावर पांढरे पट्टे मारले नसल्याने अंदाज येत नाही. बस धडकलेल्या विद्युत खांबात वीजपुरवठा सुरू नसल्याने सर्वजण बचावले. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे. टँकरचालक किसन म्हस्के (रा. कोल्ही ता. वैजापूर) यांनी टँकर वाळूज पोलिस ठाण्यासमोर उभा केला आहे.