प्रगतशील शेतकरी पुरस्कार वितरण

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : पंचायत समिती सिल्लोड व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी सप्ताह साजरा करण्यात आला. या वेळी समारोप तालुक्यातील प्रगतशील शेतकरी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. 

कृषी विभागामार्फत आयोजित विविध स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम पंचायत समिती सभापती अनिता बनकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाला.

याप्रसंगी भाजप प्रदेश चिटणीस तथा सिल्लोड सोयगाव विधानसभा नेते सुरेश बनकर, पंचायत समिती उपसभापती भगवान आहेर, माजी पंचायत समिती सदस्य अनिल खरात, पंचायत समिती सदस्या वृषाली मिरकर, पंचायत समिती सदस्य नारायण खोमणे, भाजप भवन मंडळ तालुकाध्यक्ष एकनाथ हिवाळे, भाजप शिवना मंडळ तालुकाध्यक्ष आत्माराम पाडाळे, चेअरमन अशोक साखळे, पंचायत समिती सदस्य सुदाम बन्सोड, पंचायत समिती सदस्य अंबादास शिंदे, पंचायत समिती सदस्य इब्राहिम शेख, रोहन मिरकर, संदीप इंगळे, बाळु बन्सोड, विलास तायडे, काशिनाथ इंगळे, सहाय्यक गटविकास अधिकारी आशिष म्हस्के, कृषी अधिकारी सुनील सूर्यवंशी, कृषी विस्तार अधिकारी जॉगद्र आहेरराव, राजेंद्र लांडगे, विश्वास बन्सोड बालविकास प्रकल्प अधिकारी सुनिता सनान्से, विस्तार अधिकारी पंचायत साहेबराव शेळके, विस्ताराधिकारी शिक्षण राजू फुसे, विस्तार अधिकारी सांख्यिकी केवलसिंग पाटील, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) गट समन्वयक केशवकांत बुलबुले तसेच पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.