मंजित प्राईड वनवर्ल्ड येथे हनुमान जन्मोत्सवाच्या मुहूर्तावर प्रकल्पाची पूजा

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मराठवाड्याची शान ठरलेल्या मंजित प्राईड ग्रुपच्या वनवर्ल्ड या गृहप्रकल्पामध्ये श्रीहनुमान जन्मोत्सवाच्या शुभदिनी पूजा करण्यात आली. यानिमित्ताने लवकरच फेज २ चे लाँचिंग करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
शहरातील प्रतापनगर परिसरात उभारण्यात येत असलेली वनवर्ल्ड ही मेगा टाऊनशिप वेगाने आकार घेत आहे. सुमारे ११ एकर क्षेत्रात पसरलेल्या या प्रकल्पामध्ये २१ टॉवर्सचा समावेश आहे. ४० हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळाचे भव्य क्लबहाऊस आणि १०० हून अधिक अत्याधुनिक सुविधा या प्रकल्पाची वैशिष्ट्य आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारी ही टाऊनशिप मराठवाड्याची शान ठरत आहे. आकर्षक वास्तुरचना आणि हिरवळयुक्त वातावरणामुळे शहराला ऑक्सिजन मिळवून देणारा हा प्रकल्प ठरत आहे. फेज १ मधील सुमारे ९० टक्के घरांची बुकिंग आधीच पूर्ण झाली आहे. ग्राहकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे फेज २ च्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. फेज १ मध्ये ए-१, ए-२, बी-१, सी-१, सी-२ या निवासी इमारती तसेच ई-१ ते ई-४ या शॉप्स व ऑफिसेसमधील एकूण ४०० पैकी सुमारे ३५० फ्लॅटची विक्री यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. फेज २ मध्ये ए-३, ए-४, सी-३, सी-४ आणि बी-२ या इमारतींचे बांधकाम करण्यात येणार असून, ग्राहकांसाठी ४०० हून अधिक लक्झरी फ्लॅट्स उपलब्ध असतील.
या प्रकल्पात लँडस्केप पोडियम, जंगल गझिबो, वॉकिंग ट्रॅक, मंदिर, टर्फ क्रिकेट कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, मिनी कोचिंग ट्रेनिंग अकॅडमी, बार्बेक्यू झोन, पेडल बॉल व पिकल बॉल सुविधा, टेरेस रेस्टॉरंट, लॉन, थीम वॉल, एलिवेटेड ब्रिज, रेनवॉटर स्ट्रीम, विकसित दाट जंगल, ट्री हाऊस, सायकलिंग ट्रॅक, क्लबहाऊस, स्विमिंग पूल, जकुझी अशा जागतिक दर्जाच्या शंभर पेक्षा अधिक अ‍ॅमनेटीज आणि सुख-सुविधा उपलब्ध असणार आहेत. या कार्यक्रमाला मंजित प्राईड ग्रुपचे संचालक भूपेंद्रसिंह राजपाल, नवीन बगडिया, नितीन बगडिया, बिझनेस हेड नितीन लोखंडे, तसेच कॉन्ट्रॅक्टर सुचित जैन, सचिन जैन, प्रफुल अग्रवाल तसेच ग्रुपचे इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.