मालमत्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड

Foto

भूमिअभिलेख कार्यालयाकडून ६ कोटींच्या निधीची मागणी
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) शहरातील मालमत्तांना गटनंबरऐवजी सर्व्हे नंबर आणि सातबाराऐवजी प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. यासाठी ६ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असून, यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीसी) सादर करण्यात आला आहे. येत्या २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिली आहे.
शहरातील मालमत्ताधारकांना पीआर कार्ड उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी मालमत्तांचे पुनर्सर्वे
XX
एजपती संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर
क्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या मनपा हद्दीतील मालमत्तांच्या नोंदीसाठी पीआर कार्ड तसेच सातबारा या दोन्ही प्रकारच्या नोंदी वापरात आहेत. राज्य शासनाच्या नव्या निर्णयानुसार शहरातील मालमत्तांना पीआर कार्ड देण्याची प्रक्रिया भूमिअभिलेख विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. महापालिकेने शहराचा विकास आराखडा तयार करण्यासोबतच जीआयएस मॅपिंगच्या माध्यमातून मालमत्तांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे मनपाकडे उपलब्ध असलेला
जीआयएस मॅपिंगद्वारे माहिती संकलित
44 महापालिकेच्या जीआयएस मॅपिंगच्या माध्यमातून शहरातील मालमत्तांची माहिती संकलित केली जात आहे. पीआर कार्ड तयार करण्याच्या प्रक्रियेत हा डाटा भूमिअभिलेख विभागासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे मनपाच्या मालमत्ता नोंदी आणि भूमिअभिलेख विभागाची कार्यवाही यांचा समन्वय साधून पुनर्सर्वेक्षण व नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
मालमत्तांचा डाटा पीआर कार्ड तयार करताना महत्त्वाचा ठरणार आहे.
पीआर कार्डच्या कामासाठी लागणाऱ्या खर्चाकरिता डीपीसीकडून ६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, असा ठराव मनपाच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर हा प्रस्ताव भूमिअभिलेख विभागाकडे पाठविण्यात आला. भूमिअभिलेख कार्यालयाने पुढील कार्यवाही करीत निधीचा प्रस्ताव
डीपीसीकडे सादर केला आहे. झोन-२ कार्यालयात स्वतंत्र जागापीआर कार्डच्या कामासाठी भूमिअभिलेख विभागाने अधिकारी-कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक नियुक्त केले आहे. या पथकासाठी सिल्लेखाना परिसरातील महापालिकेच्या झोन-२ कार्यालयाच्या इमारतीत स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी पथकाने प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions