भिंत फोडून ७५ हजारांचा ऐवज लंपास

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) मोंढा नाका परिसरातील स्पेअर हार्डवेअर दुकानाच्या पाठीमागील भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी सुमारे ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मे २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. दुकानाच्या पाठीमागील भिंत फोडून चोरट्यांनी हार्डवेअर साहित्य चोरून नेले. घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयितांची ओळख पटली. त्यानुसार सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अफसर अहमद खान (वय २०, रा. जुना मोंढा) आणि शिवा शिंदे (वय २६, रा. संजयनगर, गल्ली नं. २) यांचा समावेश आहे. आरोपींकडून चोरीतील काही मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यांनी यापूर्वी केलेल्या आणखी काही चोरीच्या गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhea Solutions