छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : दुकानांचे शटर तोडून चोऱ्या करणाऱ्या एका सराईत आंतरजिल्हा चोरट्याला हसूल पोलिसांनी कबीरमठ भागातून गजाआड केले. अनिस खान ऊर्फ बाबा खलील खान (४०, रा. सईदा कॉलनी, मूळ रा. नंदुरबार) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ३ दुचाकी, हार्डवेअरचे साहित्य आणि रोकड असा २ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिस निरीक्षक स्वाती केदार यांनी दिली.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, ३० मे रोजी फिर्यादी बंडू दुधे यांची दुचाकी चोरीला गेली. या गुन्ह्याचा तपास करत असताना हसूल पोलिसांनी
कबीरमठ भागातून बाबा खानला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अनिसला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून तीन दुचाकी जप्त केल्या. या दुचाकी त्याने हर्सल जेल भागातून चोरल्याची कबुली दिली. अधिक चौकशीत आरोपीने हसूल भागातील दत्त मंदिरात चोरी केल्याचे मान्य केले. तसेच कोळठाणवाडी रोडवरील एका डेअरीचे शटर फोडून रोकड लांबवल्याची आणि जानेवारी व फेब्रुवारीदरम्यान पिसादेवी रोडवरील दोन हार्डवेअर दुकानांचे शटर तोडून मोठ्या प्रमाणावर साहित्य चोरल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलिस निरीक्षक
चालता चालता दुचाकीची चोरी
अनिस खान दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्यात सराईत आहे. चालता चालता दुचाकी लंपास करतो. त्याच्याविरुद्ध यापूर्वी सिटी चौक, बेगमपुरा, सिडको, जवाहरनगर, क्रांती चौक, मुकुंदवाडी आणि हसूल पोलिस ठाण्यात २० पेक्षा अधिक दुकान फोडी, लूटमार, घरफोडी, दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.
स्वाती केदार, उपनिरीक्षक गणेश केदार, हवालदार अनिल पालवे, फिरोज तडवी, आकाश जायभाये यांनी केली.









