चार मराठी शाळा बंद करण्याचा प्रस्ताव

Foto
नगरसेवकांनीच केली इंग्रजी माध्यमाची मागणी
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महानगरपालिकेच्या प्रभाग २९ मधील तीन आणि प्रभाग ५ मधील एक अशा एकूण चार मराठी माध्यमांच्या शाळा बंद करून त्याऐवजी इंग्रजी माध्यम आणि सीबीएसई पॅटर्न सुरू करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. या संदर्भातील प्रस्ताव सोमवारी (दि. २०) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
एकीकडे मराठी माध्यमाच्या शाळा वाचविण्यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे गेल्या दोन दशकांत महापालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्याचे कारण पुढे करत तब्बल ३९ शाळा बंद केल्या. २० वर्षांपूर्वी ७९ असलेल्या शाळांची संख्या आता ५० वर आली आहे.
विशेष म्हणजे, मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांचा दर्जा सुधारण्याऐवजी त्या बंद करून तिथे सीबीएसई पॅटर्नच्या शाळा सुरू करण्याकडे प्रशासनाचा कल वाढला.
गेल्या सहा वर्षांत महापालिकेने ६ नवीन सीबीएसई शाळा सुरू केल्या असून, या शाळांमध्ये प्रवेशासाठी दरवर्षी मोठी प्रतीक्षा
केंद्रीय बोर्डाला पसंती
खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी महापालिकेने आपल्या शाळांचा दर्जा सुधारण्याकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम आता शाळा बंद होण्यावर होत आहे. मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले. खुद लोकप्रतिनिधीच राज्य बोर्डाऐवजी केंद्रीय बोर्डाला पसंती देत आहेत. तीन नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील शाळांसाठी सीबीएसई पॅटर्नची मागणी माध्यमाच्या केल्यामुळे मराठी अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
यादी पाहायला मिळते.