आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): बुलडाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी महाराजांचा अपमान करून कॉम्रेड शहिद गोविंद पानसरे यांच्या बद्दल अपशब्द वापरले. 

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कोल्हापूरचे शहर सहसचिव व शिवाजी कोण होताचे वितरक कॉम्रेड प्रशांत आंबी यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. या विरोधात सिल्लोड भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतिने निदर्शने करून संजय गायकवाड याला अटक करा व त्याची आमदारकी रद्द करा अशी मागणी करण्यात आली आहे.