सरसकट कर्जमाफी द्या, कर्जमाफी धोरणाविरोधात शेतकरी एकवटले
श्री मारोती महाषाज संस्थान सारोळा
सिल्लोड, (प्रतिनिधी) : बुलढाणा येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवला. या वेळी सारोळा क्रांतिकारी शेतकरी संघटना व सारोळा गावातील शेतकऱ्यांच्या वतीने शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाच्या शासन निर्णयाची (जीआर) होळी करून तीव्र निषेध व्यक्त केला.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती योजनेतील जाचक अटी व शर्तीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. केली. शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना न्याय देणारी नसून अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देत शासनाने कर्जमाफीतील अन्यायकारक अटी तात्काळ रद्द कराव्यात, सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा तसेच शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रसाद पाटील वराडे आणि सरपंच मोहन गायकवाड, उपसरपंच नारायण वराडे, गणेश पाटील काकडेंसह आदींची या वेळी उपस्थिती होती.












