मुंबई नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. देशातील विविध भागात विरोधकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज मुंबईत सीजेपी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आंदोलन करणार आहे. रविवारी ठाकरे बंधू निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारणार आहेत. तर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आज दिल्लीतील जंतर मंतर इथं आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. आम आदमी पार्टी, डाव्या विचारांचे पक्ष यासह अनेक संघटनांनी घोषणा केली आहे. यामुळे दिल्लीतील ११ मेट्रो स्टेशन आज बंद ठेवण्यात येणार आहे.
बसमधून जय भीम, जय भीम च्या घोषणा...
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने आज मुंबई आणि दिल्ली येथे आंदोलनाची हाक दिली आहे. आज सकाळी सीजेपीने दिल्लीत जंतर-मंतर येथे आंदोलकांना बोलावलं होतं. पण आंदोलन सुरु होण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी सीजेपीचे नेते सौरभ भारद्वाज आणि अन्य आंदोलकांना ताब्यात घेतलं. यावेळी तिथे मोठा गदारोळ, गोंधळ पहायला मिळाला. पोलिसांनी आंदोलकांना बसमध्ये भरलं. यावेळी मीडियाशी बोलताना आंदोलक बसमधूनच जय भीम, जय भीम च्या घोषणा देत होते. जब जब मोदी डरता हैं, पुलिस को आगे करता हैं अशा घोषणा हे सीजेपीचे आंदोलक देत होते. सौरभ भारद्वाज मीडियाशी बोलताना म्हणाले की, पोलीस माझ्या घराबाहेरही उभे होते. रात्रभर उभा होता. पण तुम्ही जंतर-मंतरवर या शांततापूर्ण पद्धतीने आपलं म्हणण मांडा, रिक्षाने या, टॅक्सीने या, पायी चालत या पण या असं या सौरभ भारद्वाज यांनी सांगितलं.
मुंबईत आज ४ वाजता आंदोलन
आज मुंबईत दुपारी ४ वाजता सीजेपीच आंदोलन आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके स्वत: या आंदोलनाच नेतृत्व करणार आहेत. शिवाजी पार्क परिसरात होणार्या या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी अजून परवानगी दिलेली नाही. मुख्य निवडणूक आयोगात मतभेद असल्याचं समोर आल्यानंतर देशातील विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. ते निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
दोन दिवसांनी ठाकरेंचा मोर्चा
आज कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन आहे. दोन दिवसांनी ४ ऑक्टोंबरलाच ठाकरे बंधुंनी ज्ञानेश कुमार यांच्याच राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनाची हाक दिली आहे. भायखळा क्रूडास कंपनी ते महापालिका मुख्यालयापर्यंत त्यांनी मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चाला त्यांनी ङ्गगर्जनाफ असं नाव दिलं आहे.
कोणाच्या फायद्यासाठी सुरू आहे?
हे आंदोलन नाही. राजकारण आहे, कोणाच्या फायद्यासाठी सुरू आहे. झारखंडला जाऊन ने सपोर्ट का केला नाही. ला परमिशन नाही. भारतीय जनता पार्टीला आहे की नाही माहिती नाहीफफ अशी टीका मंगलप्रभात लोढा यांनी केली.
जंतरमंतरवर मोठ्या आंदोलनाची तयारी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आज दिल्लीतील जंतर मंतर इथं आंदोलन करण्यात येणार आहे. आम आदमी पार्टी, डाव्या विचारांचे पक्ष यासह अनेक संघटनांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस सतर्क झाले असून जंतर मंतर परिसरात बॅरिकेटिंग केली आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. नवी दिल्ली जिल्ह्यात च्या कलम १६३ अन्वये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे लेखी परवानगीशिवाय जमावबंदी (पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांचे एकत्र येणे), मिरवणुका, निदर्शने आणि धरणे आंदोलन करण्यास मनाई आहे.
काय आहेत प्रमुख मागण्या?
निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि मतदार याद्यांमधील प्रश्न उपस्थित करत ने २ ऑक्टोबर रोजी (आज) दुपारी ४ वाजता दादर येथील ङ्गछत्रपती शिवाजी महाराज पार्कफ (गेट क्र. ६ जवळ) आंदोलनाची हाक दिली आहे.
मुंबईतून सुरू होणारे हे आंदोलन देशभरात पसरणार असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार जोपर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा दिपके यांनी दिला आहे.
सीजेपीच्या मुख्य ३ मागण्या:
ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा: मुख्य निवडणूक आयुक्तांनी पदावरून दूर व्हावे.
२०२५ ची मतदार यादी फ्रीज करणे: २०२५ मध्ये तयार केलेल्या सुधारित मतदार यादीच्या आधारेच आगामी निवडणुका घेण्यात याव्यात.
पारदर्शक नियुक्ती प्रक्रिया: पुढील निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी नागरी समाजाचा सहभाग असलेली स्वतंत्र व पारदर्शक यंत्रणा उभी करावी.
१३ कोटी मतदारांची नावे वगळल्याचा गंभीर आरोप
२०२४ नंतर देशभरातील तब्बल १३ कोटी मतदारांची नावे मतदार याद्यांमधून अनधिकृतपणे वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे. विशेषतः स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन प्रक्रियेच्या नावाखाली होणार्या बदलांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीए आणि ङ्गइंडियाफ आघाडीमधील मतांच्या टक्केवारीतील फरक अतिशय कमी होता; त्यामुळे मतदार यादीतील फेरफार आगामी निवडणुकांच्या निकालांवर थेट परिणाम करू शकतात, असा दावाही ने केला आहे.