उद्यापासून जनता कर्फ्यु....

Foto
पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर ग्रामपंचायतीने उद्या पासून तीन दिवस जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेतला आहे. दि. १७ ते १९ जून पर्यंत मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. वाळूजमहानगर व परिसरात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असून येथे एकूण ११६ रुग्ण पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यातील १४ जण बरे होऊन घरी आले असून अद्याप १०२ रुग्ण उपचार घेत आहेत.  खबरदारी घेण्यासाठी पंढरपूर ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन हा निर्णय जाहीर केला.  मागील आठवड्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने यावर उपाय योजना करण्यासाठी तातडीने मासिक बैठक घेतली. यावेळी  सरपंच शेख अख्तर, उपसरपंच महेंद्र खोतकर, ग्रामसेवक नारायण रावते यांची उपस्थिती होती. या सभेत कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी सम-विषम प्रमाणे अस्थापना सुरु न ठेवता सरसकट बुधवार पासून तीन दिवस जनता कर्फ्यु लागु करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कर्फ्युमधुन रुग्णालय व औषधी दुकाने वगळण्यात आली आहे. जनता कर्फ्युचे उल्लंघन करुन दुकाने सुरु ठेवणाºयाकडून ५ हजाराचा दंड वसुल करण्यात येणार आहे. मास्क न वापरता सार्वजनिक ठिकाणी फिरणाºया नागरिकाकडून २०० रुपये दंड वसुलण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आरोग्य विभाग व आशा कार्यकर्त्या यांच्यातर्फे प्रत्येक घराचे सर्वेक्षण करुन नागरिकांना औषधीचे वाटप केले जाणार आहे. गावात नव्याने चार आरोग्य सेवकाची नेमणुक करण्यात यावी, यासाठी जि.प. प्रशासनाकडे पाठपुरावा करणे, खाजगी डॉक्टरांची सेवा घेणे आदी निर्णय या बैठकीत घेण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब राऊत, अप्पासाहेब साळे, महेबुब चौधरी, राजेंद्र खोतकर, अनिल कोतकर, तसलीम शेख, अंजीराबेगम शेख, फिरोजा शहा, पुजा उबाळे, सुमन खोतकर, मिरा गिर्हे, संगिता गायकवाड आदींची उपस्थिती होती.