छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मुख्य मिरवणुकीत कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात डीजे सिस्टीम वाजवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विविध - सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी आणि डीजे चालक अशा १७ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये क्रांती चौक पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. २७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाधव, सिध्देश निवृत्ती गटे (डीजे
रमाकांत जालिंदर इंगळे, रवी मालक), कैलास गायकवाड मित्रमंडळाचे अध्यक्ष शुभम दिनेश गवले, निखिल राहुल मोरे, संतोष लोखंडे, जुना बाजयीपुरा जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, आदित्य दादसो शेळके, अनिल मगरे, डॉल्बी चालक (कराडवाला), अभिजीत अर्जुन जाधव, दिपक मगनराव निकाळजे, राहुल मकासरे, अजय ज्ञानेश्वर रगाडे, सुमेध जाधव आणि राजीव जावळीकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. १४ एप्रिल रोजी क्रांती
चौक ते पैठणगेट या मुख्य मिरवणूक मार्गावर हा प्रकार घडला. अधिक माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिस आयुक्त कार्यालयातर्फे ध्वनीक्षेपकाबाबत अटी व शर्ती लागू करून परवाने देण्यात आले होते. मात्र १४ एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी मिरवणुकीदरम्यान अनेक मंडळांनी वाहनांच्या मूळ रचनेत बेकायदेशीर बदल करून विनापरवाना डीजे व बॉक्स स्पीकर लावून कर्णकर्कश आवाजात वाजविले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions











