पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडामध्ये गोदावरी जलकलश पूजन

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) : पाण्याचे संवर्धन व शाश्वत जलव्यवस्थापनाचा संदेश देणारा महत्त्वपूर्ण कार्यक्रम मंगळवारी (दि. २०) एप्रिल श्री तीर्थक्षेत्र सिद्धेश्वर मंदिर, कायगाव टोका येथे उत्साहात पार पडला.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६ अंतर्गत जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र. ५, छत्रपती संभाजीनगर यांच्या पुढाकाराने आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते गोदावरी जलकलश पूजन करण्यात आले..
या वेळी जलव्यवस्थापन विषयक समन्वय सभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामीण भागात जलसाक्षरता वाढविणे तसेच महिलांचा जलव्यवस्थापन प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

 या सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रशांत बंब होते. कार्यकारी अभियंता उमेश वानखेडे, उपविभागीय अभियंता विठ्ठल गावंडे, उपविभागीय अधिकारी कमलाकर पवार, सहाय्यक अभियंता सचिन सोनकांबळे, शाखा अभियंता निलेश मरापे यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त गोदा ते नर्मदा जलयात्रा हा उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात  आला होता. 

या प्रसंगी जलसंवर्धनाचा संदेश देत पाटबंधारे विभागाकडे जलकलश सुपूर्त करण्यात आला. कार्यक्रमास तालुकाध्यक्ष रवि चव्हाण, शहराध्यक्ष मारुती खैरे, माजी नगरसेवक प्रदीप पाटील, भाग्येश गंगवाल, राजेंद्र राठोड, राकेश कळसकर, आनंद पाटील, कृष्णकांत व्यवहारे, जाफर शेख, राजू मोरे, दीपक साळवे, आयाज अहमद, बळीराम खताळ, अरुण लांडे, अथर जहुरी, भारत पाटील, अतुल रासकर, संदीप बोजवारे, यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य आहे. आजच्या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गोदा ते नर्मदा जलयात्रा हा उपक्रम जलसंवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे ही आजची गरज असून, सर्वांनी मिळून शाश्वत जलव्यवस्थापनाचा संकल्प करणे आवश्यक आहे. जलसंधारणाच्या माध्यमातून आपण भविष्यातील पाणीटंचाई टाळू शकतो. ङ्गचला पाण्याचे करूया संवर्धन, वसुंधरेचे करूया रक्षणफ हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.
- प्रशांत बंब,
आमदार गंगापूर विधानसभा