मनपाने नोटिसा बजावल्या; सात दिवसांत त्रुटी दूर करण्याची मुदत
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): रुग्णालय म्हणजे रुग्णासाठी सुरक्षित आश्रयस्थान असावे, अशी साधी अपेक्षा असते. मात्र शहरातील मोठ्या आणि नामांकित रुग्णालयांमध्येच अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये गंभीर त्रुटी आढळत असतील, तर रुग्णांच्या जीविताची हमी नेमकी कोण देणार, हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. जालना रोडवरील एशियन हॉस्पिटलच्या एनआयसीयूला नुकतीच लागलेली आग ही केवळ एक दुर्घटना म्हणून विसरून जाण्याची बाब नाही. या घटनेनंतर महापालिकेने केलेल्या तपासणीत शहरातील २०० पेक्षा अधिक बेड असलेल्या १० मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये सुरक्षा उपाययोजनांतील त्रुटी समोर आल्या आहेत. त्यामुळे या रुग्णालयांना महापालिकेने नोटिसा
बजावल्या आहेत.
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन विभाग आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाने मागील आठवड्यात शहरातील मोठ्या रुग्णालयांची तपासणी केली. उपायुक्त अंकुश पांढरे, आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख स्वप्नील सरदार, अग्निशमन विभागप्रमुख अशोक खांडेकर यांच्यासह आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा या पथकात समावेश
होता. तपासणीत त्रुटी आढळलेल्या एमजीएम हॉस्पिटल, अॅपेक्स हॉस्पिटल, कमलनयन बजाज हॉस्पिटल, एशियन हॉस्पिटल, डॉ. हेडगेवार हॉस्पिटल, बेंबडे हॉस्पिटल, मेडिकव्हर, सिग्मा, सेठ नंदलाल धूत यांसह अन्य रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या असून सात दिवसांत त्रुटी दूर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे अनेक रुग्णालयांतील आयसीयू कक्षातून बाहेर
एखादी दुर्घटना घडण्याची वाट बघणार का ?
नोटिसा बजावल्यानंतर सात दिवसांनी पुन्हा तपासणी होणार आहे का, त्रुटी दूर न करणाऱ्या रुग्णालयांवर प्रत्यक्ष कारवाई होणार आहे का, की काही दिवसांनी हा विषय फाईलमध्ये बंद होऊन पुन्हा एखादी दुर्घटना घडण्याची वाट पाहिली जाणार? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
पडण्यासाठी आवश्यक असलेला स्वतंत्र आपत्कालीन दरवाजाच नसल्याचे तपासणीत दिसून आले. अग्निशमन यंत्रणा उभारण्यात आली आहे; मात्र ती कार्यान्वित नसल्याचेही आढळले. त्याहून गंभीर म्हणजे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आग लागल्यास ती विझविण्याचे प्रशिक्षण नसल्याचेही समोर आले.
काही मोठ्या रुग्णालयांतील डॉक्टरांनाही आयसीयूमधील अग्निसुरक्षा यंत्रणेबाबत पुरेशी माहिती नसल्याचे तपासणीदरम्यान निदर्शनास आले. हा
प्रकार धोकादायक आहे. कारण आयसीयू किंवा एनआयसीयूमध्ये दाखल असलेला रुग्ण स्वतःच्या जीवाच्या बचावासाठी धावू शकत नाही. अशा परिस्थितीत आग लागल्यास पहिल्या काही मिनिटांत प्रशिक्षित कर्मचारी, कार्यरत अग्निशमन यंत्रणा आणि सुरक्षित बाहेर पडण्याचा मार्ग हेच त्यांचे खरे संरक्षण असते. यापैकीच मूलभूत व्यवस्था अपुरी असेल, तर महागडे उपचार, अत्याधुनिक उपकरणे आणि मोठ्या इमारतींचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
r.sanj Powered By: Vrudhee Solutions















