दरवाज्यात बसणार्‍या प्रवाशांना आरपीएफने दिली समज !

Foto


औरंगाबाद :  रेल्वेने प्रतिदिन हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यात काही प्रवासी रेल्वेच्या दरवाज्यात बसून प्रवास करतात. तर काही जण दरवाज्यात उभे राहून फोनवर बोलतात यामुळे प्रवासांचा तोल जाऊन अनेकजण गंभीर जखमी होत आहेत. अशा प्रवाशांना समज देण्यासाठी आरपीएफने शोध मोहीम सुरु केली असून दरवाज्यात बसणार्‍या प्रवाशांना समज दिली जात आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने वारंवार दरवाज्यात बसून प्रवास करु नका असे सांगण्यात येते. मात्र काही जण या आदेशाचे पालन करत नाही. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र आता रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी स्वतःच दरवाज्यात बसणार्‍या प्रवाशांना समज देत आहे. महिनाभरात एक हजार प्रवासी दरवाज्यात बसून प्रवास करत असल्याचे रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक अरविंद शर्मा यांनी दै. सांजवार्ताशी बोलताना सांगितले.
 
सचखंड, तपोवन एक्स्प्रेसमध्ये सर्वाधिक प्रवासी
सचचंड एक्स्प्रेस आणि तपोवन एक्स्प्रेसमध्ये सर्वाधिक प्रवाशांची गर्दी असते. त्यातच काहीजण दरवाज्यात बसूनच प्रवास करत आहे. सचखंड, तपोवन एक्स्प्रेसमध्ये सर्वाधिक प्रवासी दरवाज्यात बसून प्रवास करतात. प्रवाशंनी दरवाज्यात बसून प्रवास करु नये अन्यथा रेल्वे पोलिस कारवाई करेल असा आवाहनही रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने करण्यात आले आहे.