छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) ः एका १२ वर्षीय मुलाने गुटखा पुडी आणण्यास नकार दिल्याने झालेल्या वादातून मोठा राडा झाला. टोळक्याने गुंडागर्दी करीत घरावर दगडफेक केली तर घरासमोरील दुचाकीची तोडफोड केली. ही घटना ६ मार्च रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास आसेफिया कॉलनी ल्ली नं १८ येथे घडली. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख जुनेद शेख अन्सार, शेख मुदस्सिर शेख जाकेर, शेख सद्दाम शेख जामीर, शेख इम्रान शेख शाकीर, शेख जूबेर शेख शाकीर रा. आसेफिया कॉलनी अशी आरोपींची नावे आहेत. याप्र्रकरणी शेख अहेमद शेख सांडू यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार फिर्यादींच्या पुतण्याच्या मुलाला आरोपींनी पुडी आणण्यास सांगितले. नकार दिला असता मारहाण केली. गल्लीत उभ्या असलेल्या दुचाकीवर दगड टाकले. शेख जुनेद याने धारदार वस्तूने फिर्यादींच्या डोक्यात मारून जखमी केले.










