नालिक : नाशिक पुण्यातील छात्रों की गूंज कार्यक्रमानंतर काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे बुधवारी पुन्हा महाराष्ट्राच्या दौर्यावर आले आहेत. संघटन सृजन अभियानांतर्गत निवड झालेल्या राज्यातील काँग्रेसच्या ७८ नवनियुक्त जिल्हाध्यक्षांशी ते नाशिक येथील प्रशिक्षण शिबिरात संवाद साधतील. यावेळी ङ्गजागतिक राजकारण आणि भारतफ या विषयावर त्यांचे भाषण होणार आहे. राहुल गांधी यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर गंगापूर धरण परिसरातील कार्यक्रमस्थळाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. धरणाकडे जाणारा रस्ता लोखंडी जाळ्या अर्थात बॅरिकेडिंगने बंद करण्यात आला आहे.
अखिल भारतीय काँग्रेसच्या प्रशिक्षण विभागाच्या वतीने गंगापूर धरण परिसरातील एमटीडीसी रिसॉर्टमध्ये आयोजित दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचा समारोप बुधवारी खासदार राहुल गांधी यांच्या विशेष मार्गदर्शनाने होणार आहे. या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील आदी नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहतील.
शिबिरात राहुल गांधी साडेचार ते पाच तास थांबणार आहेत. प्रारंभी नवनियुक्त जिल्हाध्यक्षांशी ते संवाद साधतील. त्यानंतर ङ्गजागतिक राजकारण आणि भारतफ या विषयावर भाषण करतील. आदिवासी शिष्टमंडळाशी तसेच राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशीही राहुल गांधी चर्चा करणार असल्याचे प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी सांगितले. शिबिराचा समारोप बंद दाराआड होणार असून, या कार्यक्रमास प्रसारमाध्यमांनाही प्रवेश नाकारण्यात आला आहे. या दौर्याच्या पार्श्वभूमीवर गंगापूर धरण परिसरातील कार्यक्रमस्थळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
प्रशिक्षणात सर्व जिल्हाध्यक्षांना दिल्लीहून आलेल्या खास प्रशिक्षकामार्फत मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण देण्यात आले. यात आधीपासून पारंगत असणारे राहुल गांधी नवनियुक्त जिल्हाध्यक्षांबरोबर काही काळ खेळणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याला प्रथमच भेटण्याची आणि संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे यावेळी राहुल गांधी काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांशी भेट
आदिवासी विद्यार्थ्यांच्या नाशिकमधील आंदोलनस्थळी मंगळवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विक्रांत भुरिया यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचीही भेट घेणार आहे. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी महायुती सरकारवर टीका केली. राहुल गांधी यांनी पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्यानंतर सरकार खडबडून जागे झाले आणि घाईघाईत मागण्या मान्य केल्याचे ते सांगत आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. त्यांचे आश्वासन म्हणजे ङ्गलबाडाघरचे जेवणफ आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली. नाशिक विभागात आदिवासींची लोकसंख्या जास्त असल्याने नाशिकमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मंजूर कराव्यात, अशी मागणी सपकाळ यांनी केली.