कत्तलखान्यावर छापा; चौघांच्या आवळल्या मुसक्या

Foto
वाळूज महानगर, (प्रतिनिधी) : साजापूर कब्रस्तानजवळ गट नंबर ५९ मधील अनुसया कॉलनी रस्त्यावर सुरू असलेला कत्तलखान्यावर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी रविवारी (दि.१३) मध्यरात्री १२ वाजता छापा मारला. यावेळी दोन लाख १५ हजार रुपये किंमतीच्या ९ जनावरांची सुटका केली. दरम्यान, कत्तलीसाठी वापरण्यात येणारे
सुरे, कुऱ्हाडी व वजन काट्यासह चार आरोर्षीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.

फिर्यादी पोलीस हवालदार अमोल तुकाराम मनोरे हे शनिवारी (दि.१२) रात्री ११:३० वाजता ठाण्यात हजर होते. दरम्यान, पोनि रामेश्वर गाढे यांनी पोउपनि सुरेश सांगळे, संजय जगताप, अंमलदार प्रकाश वाघ, कमलेश पठारे, कल्याण खामकर यांना मिळालेल्या माहितीवरून साजापूर कब्रस्तानजवळ ईरफान मञ्जीत कुरैशी, सांडू मजीत कुरैशी, सिराज मञ्जीत कुरैशी, खाजा मजीत कुरैशी (सर्व रा. आंबेलोहळ, हमु, साजापूर) यांनी गोवंश कत्तलीसाठी वाहनात आणून डांबून ठेवले आहे. 

काही गोवंशाची कत्तल केली जात असल्याची खात्रीलायक माहिती देत, पंचासमक्ष कारवाईचे आदेश दिले. दरम्यान, पोलीस पथक पंचासमक्ष हजर होताच यावेळी पथकाला पाहताच पळून जाणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले. तसेच येथील पत्र्याच्या कंम्पाऊंडमध्ये कत्तलीसाठी ७ बैल व २ कालवड असे एकूण दोन लाख १५ हजार रुपये किंमतीचे ९ जंनावरे दिसून आले. 

तसेच सहाशे रुपये किमतीचे लोखंडी धातूचे लहान मोठे सुरे, दीड हजार रुपये किंमतीच्या कुऱ्हाडी व हजार रुपये किंमतीचा वजनकाटा असे तीन हजार शंभर रुपयांचे साहित्य ताब्यात घेतले. विशेष म्हणजे येथील पत्र्याच्या बॉक्समध्ये जनावरांची कातडी व शिंगेही आढळली. याप्रकरणी चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहे.