गंगापूर, (प्रतिनिधी): भेंडाळा येथे सरकारी दवाखान्याच्या मागील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी बुधवारी (दि.२४) सायंकाळी धाड टाकून १२ जणांना रंगेहात पकडले. या कारवाईत रोख रक्कम, ५२ पत्त्यांचा कॅट व इतर साहित्य असा एकूण ८ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार विठ्ठल जाधव व पोलीस कर्मचारी अर्जुन सिंगल यांनी पथकासह पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला. यावेळी काहीजण पैशांवर तिर्रट नावाचा पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सर्वांना ताब्यात घेतले.
अंग झडतीदरम्यान त्यांच्याकडून रोख रक्कम तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी देविदास कचरू तुपे (५४), कारभारी केरूजी गायकवाड (५९), विकास भिकचंद तुपे (२७), महेश बापू तिखे (२६), प्रकाश निवृत्ती तुपे (३२), आदित्य पांडुरंग काळे (१९), सुनील कडू तुपे (३८), संदीप दिलीप तुपे (४५), गोकुळ कडू तुपे (४५), अमोल गोरखनाथ बोरगे (३२), विकास निवृत्ती तुपे (२९) सर्व रा. भेंडाळा, (ता. गंगापूर) तसेच संतोष अशोक जाधव (२७, रा. प्रवरा संगम, ता. नेवासा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











