चांगतपुरी येथे जुगार अड्ड्यावर धाड, एक लाख ५६ हजारचा मुद्देमाल जप्त

Foto
सात जुगाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

पैठण, (प्रतिनिधी) : तालुक्यातील चांगतपुरी येथील ब्राह्मणाच्या खळ्यात सुरू असलेल्या तिरट नावाच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून सुमारे एक लाख ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून सात जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी, की चांगतपुरी येथील ब्राह्मणाच्या खळ्यात तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच या ठिकाणी धाड टाकून पोलिसांनी सुमारे एक लाख ५६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून सचिन कारभारी मुळे, नामदेव विठ्ठल खाडे, सचिन गोरखनाथ शिंदे, बाळासाहेब विश्वनाथ व्होरकडे, गणेश सूर्यकर्ण खेडकर व एक अनोळखी अशा सात जनाविरुद्ध मुंबई जुगार कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल पुरी हे करीत आहे या कारणामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पैठण तालुक्यातील अनेक गणेश मंडळाच्या जवळ जुगार अड्डे सुरू असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.