औरंगाबाद:- दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने परभणी ते मुदखेड दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. त्या कामामुळे अनेक रेल्वे रद्द तर अनेक रेल्वे अंशतः रद्द करण्यात आल्या आहे. परंतु हा मेगाब्लॉक आता डोकेदुखी ठरत असून प्रवाशांना त्याचा मनस्थाप सहन करावा लागत आहे. पर्यायी व्यवस्था उपलब्ध करायला हवी होती. अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
रेल्वे विभागाच्या वतीने परभणी या ठिकाणी मेगाब्लॉकचे काम सुरू आहे. परंतु त्याचा त्रास औरंगाबाद च्या प्रवाशांना कशासाठी? असा प्रश्न रेल्वे प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. यामुळे बऱ्याच रेल्वे रद्द झाल्या असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. मेगाब्लॉक चे काम हाती घेताना रेल्वे विभागाच्या वतीने पर्यायी व्यवस्था का केली नाही? असाही प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. पर्यायी व्यवस्था न केल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या मेगाब्लॉक च्या कामामुळे नांदेड- नगरसोल रेल्वे ८ ते १४ फेब्रुवारी दरम्यान रद्द केली आहे. तर नांदेड -औरंगाबाद १० ते १५ फेब्रुवारी तर औरंगाबाद - हैदराबाद १० ते १५ फेब्रुवारी दरम्यान रद्द करण्यात आली आहे . याशिवाय नागपूर-मुबंई- नंदीग्राम ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान रद्द करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागला आहे.