मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यात पडणार पाऊस

Foto
छत्रपती संभाजीनगर : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाल्याची परिस्थिती असताना, आता पुन्हा एकदा पुढील आठवड्यात  मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आले आहे.


 प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या अंदाजानुसार,१३ मार्चला छत्रपती संभाजीनगर , जालना  जिल्ह्यात तर १४ मार्चला छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच मराठवाड्यात १४ मार्चला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

केंद्राचा अंदाज!
मराठवाड्यात १० ते १६ मार्चदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी तर किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.  तसेच १७ ते २३ मार्चदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी, किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तर विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात १५ ते २१ मार्चदरम्यान कमाल आणि किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker