फुलंब्री, (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृती व्हावी, या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडगाव हिवरा येथे विशेष कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यातील हा पहिलाच विशेष जनजागृती कार्यक्रम ठरला.
लाडगाव हिवरा येथील गणपती मंदिरात गुरुवारी शिवलीला पाटील ह.भ.प. यांनी कीर्तनातून ओघवत्या व प्रभावी शैलीत पंचायतराज व्यवस्था, ग्रामविकास, स्वच्छता, लोकसहभाग व शासनाच्या विविध योजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास अभिजित जोशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रहार ढोकणे, गटविकास अधिकारी मीना रावतळे, शिवाजी सोळुंके, सिद्धांत पाटोळे, साहेबराव सोळसे, रामदास पाथरे, ग्रामपंचायत अधिकारी नानासाहेब चव्हाण, अरविंद वाघ, मधुकर चाबुकस्वार, रवींद्र नाईक, गंगाधर हारदे,
हरिदास पाथरे, अशोक राठोड, एन.डी. चव्हाण, भागीनाथ, ए.डी. चव्हाण यांच्यासह सरपंच जयश्री बागल, उपसरपंच लक्ष्मी बागल, ग्रामपंचायत सदस्य संतोष बागल, जीजा बागल, शिलाबाई इथ्थर, लक्ष्मी धाडगे, रंजना इथ्थर, सरला पोफळे, भगवान पोफळे, शोभा डोगरे, राधाकिसन इथ्थर, गजानन बागल, सुभाष बागल, लक्ष्मण बागल, विजय बागल, विलास इथ्थर, भाऊसाहेब धाडगे, राजू इथ्थर, शिवाजी बागल, भरत शेजवळ, मनोज गाडेकर, जयराम पोफळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.















