मुंबई : राज्यात २९ महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. काल (शुक्रवारी) उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे बंडखोरांची नाराजी दूर करून त्यांची मनधरणी करणे प्रत्येक पक्षासमोर आव्हान होते. त्यात भाजपाने अनेक नाराजांची समजूत काढण्यात यश मिळवले. त्याशिवाय अपक्ष आणि प्रमुख विरोधी पक्षांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राज्यात महायुतीचे ६५ उमेदवार बिनविरोध विजयी झाले. आता या उमेदवारांबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे या उमेदवारांविरोधात पुरावे असल्याचे सांगण्यात येत आहे. ठाकरे आता कोर्टात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे ठाणे, कल्याण डोंबिवलीसह राज्यात निवडून आलेल्या ६५ महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात राज ठाकरे यांच्याकडे पुरावे आहेत. महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये राज ठाकरे बिनविरोधत विजयी झालेल्या उमेदवारांची पोलखोल करणार आहेत.
उमेदवारांचे कॉल रेकॉर्ड, व्हिडीओ मिळाले
राज्यभरात काल उमेदवारांना अर्ज माघार घेण्यासाठी नेत्यांनी कॉल करुन दबाव आणल्याचा दावा केला आहे. याबाबत कॉल रेकॉर्ड , व्हिडीओ यांच्यासह अनेक महत्त्वाचे पुरावे राज ठाकरे यांच्याकडे नेत्यांनी सुपूर्त केले आहेत.
येत्या सोमवारी मनसे या ६५ बिनविरोध उमेदवार आणि त्यांच्या जागांबाबत कोर्टात जाणार आहेत.
याबाबत मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली. "उद्या निवडणूक आयुक्त यांची भेट घेणार आहे. आम्ही ज्या ६४ उमेदवारांच्या ठिकाणी ज्या घटना घडल्या आहेत. त्याची माहिती देणार आहे. सोमवारी आम्ही कोर्टात जाणार आहे. नगरसेवकांविरोधात आम्ही कोर्टात जाणार. आधी आम्ही पत्रव्यवहार करणार आहे, असंही जाधव म्हणाले