औरंगाबाद: राजर्षी शाहु महाराज यांची जयंती आज विविध पक्ष संघटनांच्या वतीने उत्साहपुर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिलकॉर्नर येथे पुर्णाकृती पुतळ्यास महानगरपालिकेच्या वतीने महापौर नंदकुमार घोडेले व अन्य अधिकारी पदाधिकार्यांनी अभिवादन केले.
बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हाध्यक्ष किशोर जोहरे, अशोक कांबळे, तुपसागर यांनी तर रिपाइं आठवले गटाच्या वतीने लक्ष्मण हिवराळे, प्रकाश गायकवाड, मधुकर चव्हाण, भीमशक्तीतर्फे दिनकर ओंकार, राहुल सावंत,
पंडितभाई नवगिरे, शांतीलाल गायकवाड, काँग्रेस पक्षातर्फे संतोष भिंगारे, सचिन शिरसाठ, प्रविण सरपते व विविध पक्ष संघटनातर्फे अभिवादन करुन जयंती साजरी करण्यात आली.










