फुलंब्री, (प्रतिनिधी) येथील नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे राजेंद्र ठोंबरे हे १७९७ मताधिक्याने निवडून आले होते. तर महाविकास आघाडीचे १२ नगरसेवक मोठ्या फरकाने निवडणून आले आहे. सोमवार २९ रोजी सकाळी १० वाजता राजेंद्र ठोंबरे हे नगरपंचायतीचा पदभार स्वीकारणार आहेत.
तत्पूर्वी शहरातील संस्थान गणपती मंदिरात आरती अभिषेक करणार असून, मंदिरापासून पदयात्रा मिरवणूक काढून पदभार नगरपंचायत येथे स्वीकारणार आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सभा होणार आहे. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, खासदार कल्याण काळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पदग्रहण सोहळ्यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी केले.















