राजेंद्र ठोंबरे यांचा उमेदवारी अर्ज वैध

Foto
तिसऱ्या अपत्याप्रकरणी घेतला होता आक्षेप सुनावणीअंती उमेदवारी अर्जाबाबत निर्णय

फुलंब्री, (प्रतिनिधी)  : : नगरपंचायत निवडणुकीच्या अध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे याचे तिसरे आपत्य नसून ते दत्तक पुत्र असल्याचा युक्तीवाद ठोबरे यांच्या वकिलांनी सुनावणी अंती केल्याने ठोंबरे यांच्यावर केलेला आक्षेप आखेर निष्फळ ठरला. माजी नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांनी अर्ज छाननी प्रसंगी ठोंबरे याच्या उमेदवारी अर्जावर तिसरे आपत्य असल्याचा आक्षेप निवडणूक मुख्याधिकारी तथा तहसीलदार योगिता खटावकर व सहायक निवडणूक अधिकारी यांच्याकडे केला होता.

या प्रकरणी मंगळवारी उशिरापर्यंत सुनावणी सुरु होती. यावेळी दोन्ही बाजूंच्या वकिलांनी बाजू मांडत जोरदार युक्तिवाद ठोंबरे यांनी सांगितले. बुधवारी याप्रकरणी ही सुनावणी दोन्ही बाजूंच्या तीन वकीलांनी यावर युक्तिवाद केला. यात हे तिसरे आपत्य नसून दत्तक पुत्र असल्याचे निष्पन्न झाले. २००५ नंतर राजेंद्र ठोंबरे यांनी जि. प. विधानसभा, नगरपंचायत, बाजार समिती अशा निवडणूक लढवली. 

त्यावेळेस कोणीही आक्षेप घेतला नाही, असे या निर्णयामुळे यामुळे सुहास शिरसाठ यांचा आक्षेप फोल ठरत राजेंद्र ठोंबरे यांची उमेदवारी वैध ठरला आहे. हा निकाल हाती पडताच ठोंबरे यांच्या कार्यलयात अभिनदनासाठी मोठी गर्दी जमा झाली. मोठ्या प्रमाणात फटाक्याची अतिशबाजी झाली. या विषयी शहरात हा चर्चेचा विषय होता. तर यावेळी काही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. 

रात्री १२ वाजल्या पर्यंत येथील गजबजलेल्या टि पाँईटवर मोठ्या प्रमाणात लोक गटा गटाने चर्चा करत होते. शेवटी निकाल मनसारखा लागल्याने ठोंबरे गटाकडून आनंद व्यक्त करण्यात आला असून हा विजयाचा संकेत असल्याचे बोलल्या जात आहे.