सिल्लोड, (प्रतिनिधी): राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ व तेजस्वी विचार बाळगणारे थोर विचारवंत स्वामी विवेकानंद यांची आज जयंती या दोन्ही योग्य पुरुषांची जयंती आपण मुर्डेश्वर हायस्कूल व मुरुडेश्वर कनिष्ठ महाविद्यालय लिहा खेडी येथे साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक राजपूत सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मुर्डेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डी. आर. कळात्रे, ज्येष्ठ शिक्षक पवार, उबाळे ज्येष्ठ शिक्षिका कोल्हे, श्रीमती खैरनार मॅडम सुतार मॅडम तसेच पालक प्रतिनिधी संजय बावस्कर विशेष उपस्थिती जाधव व धनवई या सर्वांची कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.
प्रमुख पाहुण्यांनी विद्याथ्यांना राजमाता जिजाऊ यांनी महाराष्ट्राच्या मातीसाठी दोन छत्रपती देऊन खूप मोठी प्रेरणा आपल्या महाराष्ट्रासाठी या मातेने दिली तसेच जिजामातेने या दोन्ही
छत्रपतींचे पालन पोषण करत असतानाच लढाई व न्यायाचे धडे व सामाजिक जाणीव याचे शिक्षण या थोर पुरुषांना दिले त्यातूनच ये दोन्ही छत्रपती संपूर्ण देशामध्ये मध्ये आज आपण नावारूपाला किंवा कार्यामध्ये किती तत्पर होते, याची प्रचिती येते, असे सांगितले.
तसेच स्वामी विवेकानंदांनी सुद्धा आपल्या देशातील दिन दरिद्री जनतेसाठी आणि युवकांसाठी जे कार्य केले ते प्रेरणा स्वरूप आज आपण संपूर्ण देशांमध्ये बघत आहे आणि त्यांच्या कार्याला आजही नवतरुण वर्गामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याची छाप आहे.
या दोन्ही युग पुरुषांची माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीमान राजपूत सर यांनी विद्यार्थ्यांना या दोन्ही महापुरुषांनी आपल्या समाजासाठी व देशासाठी किती मोठे योगदान आहे. यासंबंधी मार्गदर्शन केले. खैरनार यांनी सूत्रसंचालन केले आणि सुतार यांनी आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रम प्रसंगी मोठ्या संख्येने गावकरी मंडळी विद्यार्थी उपस्थित होते. अशाप्रकारे या महापुरुषांची जयंती अतिशय उत्साहात साजरी झाली.